समाजसंवाद
१८.४.२४
दोन तीन दिवसापूर्वीची घटना. एक फोन आला. समोरचा राहुरी तालुक्यातून नगरला मोटारसायकलवर येत असताना त्याची मोटारसायकल फायनान्स वसुली करणाऱ्या मुलांनी गाडी आडवी लावून त्यांना खाली उतरवून ताब्यात घेतली. अतिशय उर्मट, दादागिरी भाषा करून ती गाडी चालवायला त्यातील एक बसला. पाच हजार दिले तर सोडतो म्हणाला. जवळच्या गोडवूनला गाडी जमा केली. मी त्यास त्यांच्याकडे फोन दे म्हणालो पण त्यांनी फोन घेतला नाही. त्यांच्या गाडीला नंबरपण नव्हता. मी त्यास त्या लोकांचे फोटो काढायला सांगितले पण त्यांनी तोंड रुमालाने बांधले. शेवटी गोडावूनवाल्याला फोन घ्यायला लावला व त्याच्याकडून कंपनीच्या मॅनेजरचा नंबर घेतला. तेव्हा ते फायनान्स वसुलीवाले आहेत याची खात्री झाली.
सदर माणूस आपल्या नवजात नातवाला रक्तदान करण्यासाठी एक रक्तदाता घेऊन दुसऱ्याची मोटारसायकल घेऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये एकाचा डबा द्यायचा व त्या रक्तदात्याच रक्त घेऊन नवजात बालकाला कावीळ झाली होती त्याला द्यायचे होते. तो त्यांना विनवणी करायचा की, मला दवाखान्यात सोडा मी गाडी तिथे तुम्हाला देतो. परंतु त्याचे न ऐकता गाडी जमा केली.
मी तातडीने तेथे जाऊन ते गाडी जमा करणाऱ्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला स्वतः त्यांना घेऊन गेलो. त्यांच्या विरोधात तक्रार घ्या म्हणालो परंतु पोलिसांनी त्यास नकार दिला. सदर अधिकारी यांच्याशी संपर्क केला त्यांनीही अजिबात साथ दिली नाही व तक्रार घेतली नाही. परंतु गोडावून वरून घेतलेला नंबर घेवुन बोलतो म्हणाले. मला राग अनावर झाला. शेवटी आता मीच त्या गाडी जमा करणाऱ्यांना चोपतो म्हणालो व त्यांना शोधले परंतु ते गायब झाले.
ह्या सर्व गडबडीत सुमारे दीड दोन तास गेले. कायदेशीर गाडी ताब्यात घेऊ शकत नाहीत. परंतु जादा त्रास नको म्हणून त्यांना डबा देऊन बाळासाठी रक्त देणाऱ्याला त्या हॉस्पिटलमध्ये सोडले. तोपर्यंत आईचे रक्त व रक्तदात्याचे रक्त पेढीत जुळवावे लागते. २४ तासापेक्षा जास्त वेळ झाल्याने आईचे फ्रेश रक्त आणण्यास सांगितले. यांच्याजवळ कुठलेच वाहन नव्हते. त्यांनी फोन करून राहुरीवरून आईचे रक्त आणायला सांगितले. मी सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून वस्तूस्थिती सांगून गाडी द्यायला सांगितली. त्यांनी माणुसकी दाखवली परंतु तोपर्यंत खूप मानसिक त्रास झाला. घेतलेले कर्ज वेळेवर भरावे ह्या भूमिकेचे आम्ही आहोत. परंतु ही वसुलीची पद्धत नको, म्हणून पोलिसांनी याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही आशा पद्धतीने वसुली करणाऱ्या कंपनीला ठोकणार, हे नक्की.
- संदेश कार्ले